08.11.2025 : राज्यपालांनी दिली स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट
08.11.2025 : भारत पर्व २०२५ च्या निमित्ताने एकता नगर येथे स्थित स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे सौभाग्य लाभले. राष्ट्राच्या एकता, दृढता आणि अखंडतेचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना वंदन केले. या भव्य स्मारकाचे दर्शन घेताना अभिमान आणि प्रेरणेची अनुभूती झाली. सरदार पटेल यांच्या जीवन, संघर्ष आणि समर्पणाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन अद्भुत आणि प्रेरणादायी आहे. हे प्रदर्शन प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे केवळ एक स्मारक नसून, “एक भारत, श्रेष्ठ भारत” या स्वप्नाचे जाज्वल्य प्रतीक आहे.