08.11.2025 : राज्यपालांनी दिली एकता नगर येथील ‘भारत दर्शन’ पॅव्हेलियनला भेट
08.11.2025 : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी एकता नगर येथे ‘भारत दर्शन’ या पॅव्हेलियनला भेट दिली. हे पॅव्हेलियन विविधतेतून एकता या संकल्पनेचे सुंदर प्रतीक आहे. या ठिकाणी एका छताखाली देशातील सर्व राज्यांची संस्कृती, परंपरा, लोककला, हस्तकला आणि विकास प्रवास यांचे जिवंत दर्शन घडते. प्रत्येक राज्याच्या पॅव्हेलियनला भेट देऊन तेथील कला, हस्तकला आणि जनजीवनाची झलक पाहिली. गुजरात पर्यटन विभागाने उभारलेल्या खाद्य आणि हस्तकला स्टॉल्सनी स्थानिक परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचा सुंदर परिचय करून दिला. भारत पर्वाची ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला साकार रूप देते व देशातील प्रत्येक नागरिकामध्ये अभिमान, एकता आणि आत्मीयतेची भावना दृढ करते.