08.08.2024: राज्यपालांच्या हस्ते पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उदघाटन
08.08.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण प्रदर्शनाचे (IIJS Premiere) उदघाटन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथे संपन्न झाले. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या असलेल्या या रत्न आभूषण प्रदर्शनात हिरे, सोने, प्लॅटिनम व चांदीचे दाग - दागिने यांसह नैसर्गिक हिरे, रत्न व प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन सोहळ्याला राज्याचे कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, ब्रँड अम्बॅसेडर 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर, 'डी बिअर्स' समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष पॉल राऊली, निमंत्रक निरव भन्साळी, जॉय अलुक्कास समूहाचे व्यवस्थापक पॉल अलुक्कास तसेच विविध देशांमधून आलेले निर्यातदार, प्रदर्शक व ग्राहक उपस्थित होते.
08.08.2024: Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 5 - day India International Jewellery Show (IIJS - 2024) Premiere organised by the Gem & Jewellery Export Promotion Council at the Jio World Convention Centre at BKC Mumbai. The India International Jewellery Show is stated to be the 2nd largest Business to Business Jewellery Fair in the world. The Governor released the Pocket Guide to IIJS 2024 on the occasion. Minister of Skills and Employment Mangal Prabhat Lodha, Chairman of Gem & Jewellery Export Promotion Council Vipul Shah, Vice Chairman Kirit Bhansali, Brand Ambassador of the event Manushi Chhillar, Executive Vice President of Diamond Trading 'De Beers Group' Paul Rowley, Convenor Nirav Bhansali, MD of Joyalukkas Group Paul Alukkas, Clients, Retailers, Exporters and Exhibitors from across the world were present.