08.07.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचा ८० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
08.07.2025: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचा ८० वा वर्धापन दिन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार" प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, संस्थेचे विश्वस्त ॲड. उज्वल निकम, ॲड. बी. के. बर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी, दक्षिण कोरिया येथील धम्मदीप भंते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, एड. सुरेंद्र तावडे, बळीराम गायकवाड यांना देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
08.07.2025: The 80th Foundation Day of the People's Education Society, an educational institution established by Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, was celebrated today in presence of Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Yashwantrao Chavan Centre, Mumbai. The Governor presented the “Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Award” to two distinguished alumni of the institution - Maharashtra’s Minister for Higher and Technical Education Chandrakant Patil and Minister for Social Justice Sanjay Shirsat along with 20 other individuals who have made significant contributions in various fields. Union Minister for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Trustee of the Society Adv. Ujjwal Nikam, Trustee Adv. B.K. Barve, and other office-bearers were present. Popular actor Bhau Kadam, actress Kranti Redkar, Bhadant Dr Rahul Bodhi, Dhammadeep Bhante from South Koria, Director of Higher Education Shailendra Deolankar, Baliram Gaikwad were among those felicitated on the occasion.