08.06.2023: पालघरातील ‘सेवा विवेक’ – विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर’ ला राज्यपालांची भेट
08.06.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी भालीवली , जिल्हा पालघर येथील 'सेवा विवेक' - विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर' च्या ग्राम विकास व आदिवासी महिला सक्षमीकरण प्रकल्पाला भेट दिली. संस्थेतर्फे आदिवासी महिलांसाठी आयोजित बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्ग पूर्ण करणाऱ्या महिलांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या, आकाश कंदील, ट्रे, पेपर वेट आदी उत्पादनांची पाहणी केली. राज्यपालांच्या हस्ते बांबू वस्तूंच्या विक्रीसाठी पुढाकार घेणाऱ्या बांबू सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पालघरचे खासदार राजेंद्र गावित, 'सेवा विवेक'चे मार्गदशक रमेश पतंगे, संचालक प्रदीप गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, रा.स्व.संघ ठाणे जिल्हा संघचालक चंद्रशेखर सुर्वे तसेच आदिवासी महिला व बांबू सेवक उपस्थित होते.
08.06.2023: Governor Ramesh Bais visited 'Seva Vivek' the Village Development and Tribal Women Empowerment Project of Vivek Rural Development Center at Bhalivali, District Palghar. The Governor gave away the Certificates to women who completed the Bamboo Craft training programme organized by 'Seva Vivek'. The Governor inspected an exhibition of bamboo products and felicitated 'Bamboo Sevaks' from the State. Palghar MP Rajendra Gavit, 'Seva Vivek' Patron Ramesh Patange, Director Pradeep Gupta, CEO Lukesh Band, RSS Thane District Sanghchalak Chandrashekhar Surve, tribal women and 'Bamboo Sevaks' were present.