08.04.2025 : ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन (AIMJF) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
08.04.2025 : ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन (AIMJF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच अध्यक्ष इक्बाल मेमन ऑफिसर यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांना दि. १० एप्रिल रोजी आयोजित जागतिक मेमन दिनाची माहिती दिली. एकता, समाजसेवा व परोपकार या भावनेने या दिवसाचे आयोजन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महासचिव अझीझ ए. सत्तार मच्छीवाला, निमंत्रक, युवा विभाग इम्रान फ्रूटवाला, विवाह नोंदणी निमंत्रक नसिमा बाई सुर्ती, सल्लागार, निजामुद्दीन रईन आदी उपस्थित होते. माजी आमदार अतुल शाह देखील यावेळी उपस्थित होते.