08.03.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
08.03.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज कन्व्हेन्शन सेंटर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती मुंबईतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्य सांगणाऱ्या संकेतस्थळाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूएचएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद, कर्नाटकच्या माजी मुख्य सचिव के रत्न प्रभा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सह-संघचालक, विष्णू वझे, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, समारोह समितीच्या सचिव मनीषा मराठे, धीरज बोरीकर, माजी खासदार डॉ विकास महात्मे आदी उपस्थित होते.
08.03.2025: Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the 300th birth anniversary celebration of Ahilyadevi Holkar at BSE Convention Centre in Mumbai. The programme was organised by the Punyashlok Ahilyadevi Holkar Trishatabdi Jayanti Samaroh Samiti, Mumbai. Swami Vigyanananda ji, Founder and President of WHF, K Ratna Prabha, former Chief Secretary of Karnataka, Dr. Prashant Narnaware, Secretary to the Governor and former MP Dr Vikas Mahatme were present.