08.03.2024 : डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्ष्यांनी घेतली राज्यपालांची भेट
08.03.2024 : डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत - डेन्मार्क राजनैयिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी राज्यपालांना सांगितले. बैठकीला डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन, डेन्मार्क संसदेचे वरिष्ठ अधिकारी व डेन्मार्कचे मुंबईतील उप वाणिज्यदूत हेन्री करकाडा उपस्थित होते.