08.03.2024: राज्यपालांच्या हस्ते कर्करुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांनाआधार देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींना ‘आय इन्स्पायर पुरस्कार’ प्रदान
08.03.2024: 'पहिले माझे कर्तव्य' (पीएमके) फाउंडेशनतर्फे कर्करुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय मदत, मानसिक व भावनिक आधार देणाऱ्या विविध क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 'आय इन्स्पायर पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ सुरेश अडवाणी, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ राजेंद्र बडवे व डॉ श्रीपाद बाणावली यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला. विविध क्षेत्रातील 20 कँसर योद्धे यांना 'आय इन्स्पायर पुरस्कार' देण्यात आला. कार्यक्रमाला फाउंडेशनच्या अध्यक्षा नयना कनल, आयोजन सचिव डॉ संदीप बिपटे तसेच समाज सेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
08.03.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'I Inspire Awards' to 20 Cancer Warriors at a function organised by 'Pahile Majhe Kartavya' (PMK) Foundation in Mumbai. The Pahile Majhe Kartyavya (PMK) Foundation is working for Cancer Care, Women’s Health and nutrition. Oncologist Dr Suresh Advani, former Director of Tata Memorial Hospital Dr Rajedra Badwe, Dr Shripad Banavali were given the Lifetime Achievement Award on the occasion. Founder Trustee of PMK Foundation Nayna Kanal, Organizing Secretary Dr Saneep Bipte and cancer warriors were present.