08.03.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'जागतिक महिला दिन सन्मान' सोहळ्याचे एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कुल मुंबई येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्यातील ४३ यशस्वी महिला उद्योजिका तसेच कौशल्य स्पर्धा विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी महाराष्ट्र व्हर्च्युअल इन्क्युबेशन सेंटर व महाराष्ट्र इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंडचे देखील उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य, पर्यटन व महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामास्वामी एन. प्रामुख्याने उपस्थित होते.