08.01.2025: राज्यपालांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाअंतर्गत रेल्वे क्रीडा मैदानावर नव्या सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन
08.01.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाअंतर्गत रेल्वे क्रीडा मैदानावर नव्या सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते आज भुसावळ विभागातील 'हॉस्पिटल ऑन व्हील्स' प्रकल्पाचे देखील उद्घाटन संपन्न झाले. यावेळी धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती व देखरेख करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण कार्याची ओळख करून देणाऱ्या 'की -मॅन : गार्डीअन्स ऑफ द ट्रॅक'' या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील आज प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापिका भुसावळ इती पांडे आणि रेल्वेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
08.01.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan inaugurated the New Synthetic Track at Railway Sports Ground at a programme organised by the Bhusaval Division of Central Railway. The Governor also inaugurated the 'Hospital on Wheels' project at Bhusaval Division. The Governor also released a Coffee Table Book 'Keyman' that brings to the fore the work of Track maintenance staff and officials. Dharam Veer Meena, General manager, Central Railway, Ity Pande, DRM Bhusaval and senior Railway officials were present.