07.11.2023 : राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे राजभवन येथे स्वागत
07.11.2023 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले. भारतातील १.४० अब्ज लोकांमध्ये 'आपण साध्य करु शकतो' हा विश्वास जागरूक झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल, असा विश्वास भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी आज येथे व्यक्त केला. औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, नेमबाज अंजली भागवत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेते प्रशांत दामले, उद्योगपती प्रकाश हिंदुजा, उद्योजक अजय पिरामल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.