07.10.2024:राज्यपालांची पालघर जिल्हयामध्ये जव्हार येथे लोकप्रतिनिधी,प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी,उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
07.10.2024: आपल्या पालघर जिल्हा दौऱ्यामध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जव्हार येथील विश्रामगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शासनाच्या विविध विकास योजनांचा आढावा घेतला. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जि.प. चे मुख्याधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर, सत्यम गांधी आदींनी राज्यपालांसमोर सादरीकरण केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उद्योग व व्यापार क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर्स व औषधी निर्माण क्षेत्रातील व्यक्ती तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील राज्यपालांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाबद्दल संवाद साधला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ हेमंत सावरा, माजी खासदार राजेंद्र गावित, माजी आमदार विवेक पंडित यांनी देखील आज राज्यपालांची जव्हार येथे भेट घेतली.
07.10.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan held a meeting of senior officials of the district administration of Palghar and reviewed the progress of various welfare schemes of the government at Guest House in Jawhar. Collector Govind Bodke, Palghar ZP CEO Bhanudas Palve, S.P. Balasaheb Patil, ITDP Project Officer Karishma Nair, Satyam Gandhi made a presentation to the Governor. Representatives of various political parties, industry and commerce, doctors and pharma sector and media had interactive meetings with the Governor . Palghar ZP President Prakash Nikam, MP Dr Hemant Savara, former MP Rajendra Gavit, former MLA Vivek Pandit were among those who met the Governor at Jawhar.