07.07.2023 : राष्ट्रपतींची राजभवनातील बंकर संग्रहालयाला भेट
०७.०७.२०२३ : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र लोकभवन येथील ब्रिटीशकालीन बंकरमध्ये तयार केलेल्या क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस राष्ट्रपतींसोबत होते. राष्ट्रपतींनी प्रथम भारतातील आदिवासी क्रांतिकारकांवरील विभागाला भेट दिली. त्यांनी बंकरमध्ये तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली. क्रांतिकारकांची दालन ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांना श्रद्धांजली आहे. जून २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
07.07.2023 : मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी राज्यपाल रमेश बैस यांचेसह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या 'क्रांती गाथा' या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकर मध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सर्वप्रथम राष्ट्रपतींनी राज्यातील तसेच देशातीलआदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत माहिती जाणून घेतली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जनजाती समाजाचे योगदान फार मोठे असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे असा अभिप्राय राष्ट्रपतींनी यावेळी दिला.