07.01.2025: राज्यपालांच्या हस्ते ३१ वा ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ प्रदान
07.01.2025: बिहार मधील ग्रामीण महिलांना उद्यमशील होण्यासाठी प्रोत्साहन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज आयएमसी चेंबर - महिला विभागातर्फे देण्यात येणारा ३१ वा 'जानकीदेवी बजाज पुरस्कार' प्रदान करण्यात आला. बिहारमधील लुप्त होत असलेल्या बावनबुटी साडीला पुनरुज्जीवित करून महिलांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. कार्यक्रमाला आयएमसी चेंबर महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती दोशी, उपाध्यक्ष राज्यलक्ष्मी राव, जानकीदेवी बजाज पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नयनतारा जैन, उद्योगपती शेखर बजाज, नीरज बजाज तसेच बजाज कुटुंबातील सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.
07.01.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan today presented the 31st IMC Ladies Wing Janki Devi Bajaj Award to Veena Upadhyaya, Founder Secretary and CEO of Srijani Foundation and Bun.Kar Bihar. The award was presented for her work in the area of promoting entrepreneurship among rural women by rejuvenating the dying art of Baavanbuti Saree. President of IMC Ladies' Wing Jyoti Doshi, Vice President Rajyalakshmi Rao, Chairperson of Janki Devi Bajaj Puraskar committee Nayantara Jain, members of Jury and members of the Bajaj family were present.