07.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यातील पवित्र जैन तीर्थ दर्शन सर्किट विकास योजनेचा शुभारंभ
07.01.2023 : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोक भवन मुंबई येथे महाराष्ट्रातील पवित्र जैन तीर्थ दर्शन सर्किट विकसित करण्याच्या राज्य पर्यटन विभागाच्या योजनेचे अनावरण केले. यावेळी राज्यपालांनी जैन तीर्थ दर्शन सर्किट पुस्तिकेचे अनावरणही केले. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, संन्यास आश्रमाचे प्रमुख महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद गिरी महाराज, पर्यटन प्रधान सचिव सौरभ विजय, मुमुक्षु रत्न सेतुकभाई शहा, भरत शहा, एमटीडीसीच्या एमडी श्रद्धा जोशी आणि निमंत्रित उपस्थित होते.