07.01.2023 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे राज्यातील पवित्र जैन तीर्थ दर्शन सर्किट विकास करण्याच्या योजनेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे करण्यात आला. यावेळी राज्यातील ९ पवित्र जैन तीर्थस्थळांची माहिती देणाऱ्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला पर्यटन व कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा, सन्यास आश्रमाचे महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद गिरी महाराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मुमुक्षुरत्न सेतुकभाई शहा, उद्योजक भरत शहा, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी व इतर निमंत्रित उपस्थित होते.