06.12.2024: राज्यपालांनी सैन्य दलातर्फे आयोजित अल्ट्रा मॅरॅथॉनला झेंडी दाखवून रवाना केले
06.12.2024: चौपनाव्या विजय दिवसानिमित्त आयोजित 'विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन'ला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. या मॅरॅथॉनचे आयोजन स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे करण्यात आले. मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून मॅरेथॉनमध्ये सहभागी सैन्य दलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे ४०५ किमी अंतर पार करणार आहेत. अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील जवान, माजी अधिकारी व जवान, युवक व एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. सैन्य दलाच्या वतीने या परिक्रमेदरम्यान नाशिक येथे 'जाणूया सैन्य दलांना' व अहिल्यानगर येथे 'सैन्य दलात महिलांना समान संधी' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर येथे माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल बिक्रमदीप सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
06.12.2024: Maharashtra Governor C. P. Radhakrishanan flagged off the Vijay Diwas Ultra Marathon organised by the Army Headquarters of Maharashtra, Goa and Gujarat Area on the occasion of 54th Vijay Diwas in Mumbai. Earlier, the Governor placed a wreath at the Colaba War Memorial and offered his homage to the martyrs who laid down their lives in the line of duty to the nation. The Vijay Diwas Ultra Marathon has been scheduled from 6th December to 16th December 2024. Fifteen elite runners from the Indian Army have embarked on a 405 km expedition, connecting Mumbai, Nashik, Ahmednagar, Kolhapur and Pune. The Ultra Marathon promises to be a grand spectacle, drawing spirited participation from Defence personnel, veterans, youth and NCC cadets. The Army has organised a series of programmes like 'Know your Army Mela' in Nashik, 'Talk on Indian Army offering Equal opportunity to women' at Ahilyanagar and 'Interaction with Veterans' in Kolhapur. Chief Of Staff, MG and G Area Maj. Gen Bikramdeep Singh and senior officers were present.