06.12.2024: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे अभिवादन
06.12.2024: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर : भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
06.12.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan accompanied by Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar offered floral tributes to Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar at the Chaityabhumi Memorial on the occasion of the 69th Mahaparinirvan Din of Dr Ambedkar in Mumbai. The Governor released the book ‘Dr. Babasaheb Ambedkar Bhartiya Prajasattak Sakarnara Mahamanav’ written by former MP and Economist Dr. Narendra Jadhav.