06.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत मातंग पुरस्कार सोहळा संपन्न
०६.१०.२०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे सामाजिक कार्य, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांना मातंग समाज रत्न, मातंग समाज मित्र आणि इतर विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. मातंग साहित्य परिषदेने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. कीर्तनकार भगवान बाबा आनंदगडकर आणि राष्ट्रीय विमुक्त भटक्या विमुक्त आदिवासी विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते यांना मातंग समाज मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत वानखेडे यांना मातंग समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.