06.06.2024: राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान
06.06.2024: राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
06.06.2024: The Governor of Maharashtra Ramesh Bais presented the Police Medals for Gallantry, President’s Police Medals for Meritorious Service and Police Medals for Meritorious Service to 115 Police Officers and Police personnel at an Investiture Ceremony held at Raj Bhavan, Mumbai. The police medals announced on the Independence Day in 2021 and the Republic Day in 2022 were given away. Addl Chief Secretary (Home) Sujata Saunik, Director General of Police Rashmi Shukla, Commissioner of Police Brihanmumbai Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, decorated police officers and police personnel and their family members were present.