06.04.2021 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारोह संपन्न
०६.०४.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ लोकभवन, मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने पार पडला. याप्रसंगी ७७५४२ पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका आणि पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे उपस्थित होते.
06.04.2021 : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्रमोद पाटील, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षांत समारोहात ७७५४२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. सौरभ संजय पाटील या विद्यार्थ्याला राष्ट्रपती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले तर महेश्वरी धनंजय गोळे या विद्यार्थिनीला कुलपती सुवर्ण पदक देण्यात आले.