06.03.2024: नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे वर्षभर चालणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न
06.03.2024: भारतीय हवामान खात्याच्या स्थापनेला पुढील वर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे वर्षभर चालणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाला. यावेळी 'मध्य भारतातील तीव्र हवामान आणि हवामान सेवा' या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नागपूर येथे कार्यक्रमाला भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर येथील उपमहासंचालक मोहनलाल साहू, माजी आमदार अनिल सोले व हवामान विभागाचे शास्त्रज्ञ, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
06.03.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presided through online mode, the launch of the yearlong celebrations of the 150th anniversary of the establishment of India Meteorological Department organised by Regional Meteorological Centre Nagpur. A workshop on 'Severe Weather and Weather Services in Central India' was organized on this occasion. Dr. Mrityunjay Mohapatra, Director General India Meteorological Department, M L Sahu, Deputy Director General, Regional Meteorological Centre, Nagpur, Anil Sole, former MLC, scientists, senior officers and staff of Meteorological Department were present.