05.05.2026 : राजे पंचम जॉर्ज स्मृती ट्रस्ट संस्थेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 05.05.2026 : राजे पंचम जॉर्ज स्मृती ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एरीक बॉर्जेस यांचेसह संस्थेच्या विश्वस्तांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना संस्थेतर्फे गरीब, निराधार तसेच कायमचे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी केल्या जाणाऱ्या रुग्णसेवा कार्याची माहिती दिली. राज्यपाल स्वतः या ट्रस्टचे मुख्य आश्रयदाते आहेत. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्रीमती भावना रॉय, माजी मुख्य सचिव यु. पी. एस. मदान, वास्तुविशारद चेतन रायकर, आइसलँडचे मानद कॉन्सल गुल कृपलानी व सीए अनिल कामत उपस्थित होते.
05.05.2026 : राजे पंचम जॉर्ज स्मृती ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एरीक बॉर्जेस यांचेसह संस्थेच्या विश्वस्तांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना संस्थेतर्फे गरीब, निराधार तसेच कायमचे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी केल्या जाणाऱ्या रुग्णसेवा कार्याची माहिती दिली. राज्यपाल स्वतः या ट्रस्टचे मुख्य आश्रयदाते आहेत. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्रीमती भावना रॉय, माजी मुख्य सचिव यु. पी. एस. मदान, वास्तुविशारद चेतन रायकर, आइसलँडचे मानद कॉन्सल गुल कृपलानी व सीए अनिल कामत उपस्थित होते.