05.04.2023 : नवी दिल्ली – पुणे सायकल स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
Zoom 05.04.2023 : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली - पुणे सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा, तसेच स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 'हिंदयान फाउंडेशन' तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतामध्ये देशव्यापी सायकल स्पर्धा होत नसून या दृष्टीने 'हिंदयान'ने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे असे सांगून राज्यपालांनी सर्व स्पर्धक व आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी हिंदयान फाउंडेशनचे संस्थापक विष्णुदास चापके, अतिरिक्त पोलीस महासंचालक रविंदर सिंघल, कर्नल विमल सेठी, ले. कर्नल. एस. चौधरी, कॅप्टन जयशंकर व एमसीपीओ ऋषी कुमार हे उपस्थित होते.
05.04.2023 : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली - पुणे सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा, तसेच स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 'हिंदयान फाउंडेशन' तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतामध्ये देशव्यापी सायकल स्पर्धा होत नसून या दृष्टीने 'हिंदयान'ने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे असे सांगून राज्यपालांनी सर्व स्पर्धक व आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी हिंदयान फाउंडेशनचे संस्थापक विष्णुदास चापके, अतिरिक्त पोलीस महासंचालक रविंदर सिंघल, कर्नल विमल सेठी, ले. कर्नल. एस. चौधरी, कॅप्टन जयशंकर व एमसीपीओ ऋषी कुमार हे उपस्थित होते.