05.02.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
05.02.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला अकोला येथून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी उप महासंचालक डॉ नरेंद्र सिंह राठौर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाख, कुलसचिव डॉ सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाच्या विविध कार्यकारी मंडळांचे सदस्य, विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, शेतकरी बांधव तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्नातकांना कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, फलोत्पादन यांसह विविध विषयांमधील पीएच.डी., पदव्युत्तर पदवी, पदवी तसेच पदविका प्रदान करण्यात आल्या.