05.01.2023 : राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठांच्या कुलगुरुंची आढावा बैठक संपन्न
05.01.2023 : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पारंपरिक विद्यापीठांच्या कुलगुरुंची आढावा बैठक राजभवन येथे संपन्न झाली. आगामी शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, परीक्षा व निकालांचे सामायिक वेळापत्रक तयार करणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) विजय अचलिया, प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे पी डांगे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कृती दलाचे सदस्य, विद्यापीठांचे कुलगुरु व अधिकारी उपस्थित होते.