04.12.2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेकडून नव्या सरकार स्थापनेचा दावा
04.12.2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
04.12.2024: Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar called on Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. They staked their claim to form the new government. Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman, former Gujarat Chief Minister Vijay Rupani, Chandrasekhar Bawankule, Praful Patel, Raosaheb Danve, Ashok Chavan, Sunil Tatkare, Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar and others were present.