04.12.2023: पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृतीपुतळयाचे अनावरण व नौसेना दिवस साजरा
04.12.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृतीपुतळयाचे अनावरण करण्यात आले तसेच तारकर्ली येथे नौसेना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच नौदलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी, व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या माध्यमातुन करण्यात आले.
04.12.2023: Prime Minister Narendra Modi unveiled the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Sindhudurg and attended the Navy Day celebrations at Tarkarli Beach in Sindhudurg district. Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde, Defence Minister Rajnath Singh, Union Minister Narayan Rane, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar and others were present. The event was hosted by Admiral R Hari Kumar, Chief of the Naval Staff and conducted by Vice Admiral Dinesh K Tripathi, Flag Officer Commanding-in-Chief, Western Naval Command.