04.10.2024 : राज्यपालांची अकोला येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
04.10.2024 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शासकीय विश्रामगृह अकोला येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार व इतर गणमान्य व्यक्तींशी संवाद साधला. अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, पंकृविचे कुलगुरु शरद गडाख, पालिका आयुक्त सुनील लहाने, यांसह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. खासदार अनुप धोत्रे, विप सदस्य वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विस सदस्य रणधीर सावरकर, हरिश पिंपळे, माजी विधानसभा सदस्य नारायण गव्हाणकर, लक्ष्मणराव तायडे, तुकाराम बिरकड, माजी विप सदस्य वसंतराव खोटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, माजी विस सदस्य बळीराम शिरस्कार आदींनी राज्यपालांची भेट घेतली.