04.09.2024: राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर जि.लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे उदघाटन
04.09.2024: उदगीर जि.लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. उदगीर येथील बुद्ध विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. मुख्य प्रवेशद्वाराची रचना सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.
04.09.2024: President of India Droupadi Murmu inaugurated the newly constructed Vishwashanti Buddha Vihar in Udgir, Dist Latur. Maharashtra Governor C.P. Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Minister of Rural Development Girish Mahajan, Minister of Sports Sanjay Bansode, Minister of Women and Child Development Aditi Tatkare, people's representatives and citizens were present. The Buddha Vihara at Udgir is a replica of the Buddha Vihara at Kalburgi in Karnataka. The main entrance is designed like a Sanchi Stupa.