04.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘रागरंजन’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
04.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'रागरंजन' पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
04.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नागपूर येथील संगीत अभ्यासक व आर. एस. मुंडले धरमपेठ आर्टस् व कॉमर्स महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या तनुजा नाफडे लिखित 'रागरंजन' या पुस्तकाचे राजभवन नागपूर येथे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, लेखिका डॉ तनुजा नाफडे, महाराष्ट्र टाइम्स नागपूरचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, साईओम प्रकाशनचे गणेश राऊत, उस्ताद मशकूर अली खान, राजे मुधोजी भोसले, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.