04.06.2023 : राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
04.06.2023 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे आयोजित जाहीर सत्कार समारंभात महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पद्मभूषण विजेते डॉ दीपक धर आणि पद्मश्री विजेते भिकूजी इदाते, डॉ परशुराम खुणे, डॉ गजानन माने, रमेश पतंगे आणि गुरू कल्याणसुंदरम पिल्लई यांचा सत्कार करण्यात आला. दिवंगत पद्मश्री राकेश झुनझुनवाला यांचा सत्कार त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी स्वीकारला. पंतप्रधान राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त रोहन रामचंद्र बहिर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नीलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील व निमंत्रित उपस्थित होते.
04.06.2023 : राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांच्या हस्ते भौतिक शास्त्रज्ञ व शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते वैज्ञानिक पद्मभूषण डॉ दीपक धर, पद्मश्री पुरस्कार विजेते भिकूजी इदाते, डॉ परशुराम खुणे, गजानन माने, रमेश पतंगे, कुमी नरिमन वाडिया व गुरु कल्याणसुंदरम पिल्लई यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा झुनझुनवाला यांनी सन्मान स्वीकारला. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन रामचंद्र बहिर याचा देखील सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील व निमंत्रित उपस्थित होते.