04.05.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून महाबळेश्वर येथील राजभवन येथे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महाबळेश्वर येथील नुतनीकृत गिरीचिंतन बंगला व कक्ष क्र. १५ ते १८ अतिथी गृहाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.