04.03.2022: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रम
04.03.2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील बहुविध उपयोगी अंतगृह क्रीडा संकुलाचे भूमिपूजन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ. सुरेश पवार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीष बैजल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. केंद्र सरकारच्या 'खेलो इंडिया' या अभियानातून १०० एकर परिसरात साकारणारे बहुविध उपयोगी अंतगृह क्रीडा संकुल हे महाराष्ट्रातील एकमेव संकुल होत असल्याची माहिती कुलगुरु डॉ फडणवीस यांनी दिली.
04.03.2022 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Multipurpose Indoor Sports Complex of the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University. The Complex is being built on an area of 100 acres of land under the 'Khelo India' Scheme. Vice Chancellor Dr Mrunalini Fadnavis, Registrar Dr Suresh Pawar, Collector Milind Shambharkar, Mun. Commissioner P Sivasankar, Police Commissioner Harish Baijal and SP Tejaswi Satpute were present.