04.01.2025 : जैन साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी घेतली राज्यपालांची भेट
04.01.2025 : जैन तेरापंथ समाजाचे आचार्य महाश्रमण यांच्या शिष्या साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी आज अन्य साध्वी व अणुव्रत विश्व भारतीच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. युवकांमधील वाढती व्यसनाधीनता व मोबाईल फोनचा अतिवापर यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर यावेळी त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली तसेच त्यांना 'डिजिटल डिटॉक्स' व 'मेडिटेट टू एलिव्हेट' या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जैन तेरापंथी महासभेचे सदस्य किशनलाल डागलिया, अणुव्रत विश्व भारतीचे महासचिव मनोज सिंघवी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजकुमार चपलोत, सभेचे मुंबई अध्यक्ष मानेक धिंग, विनोद कोठारी, कुंदन धाकड आदी उपस्थित होते.
04.01.2025 : A group of Jain Sadhvis led by Prof Mangal Pragya, disciple of the Spiritual Head of Jain Terapanth Acharya Mahashraman and members of the Anuvrat Vishwa Bharati met the Governor of Maharashtra C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. The Sadhvis briefed the Governor about their efforts towards creating Drug Free Maharashtra through initiatives such as 'Anuvrat Digital Detox' and 'Meditate to Elevate'. Member of the Jain Terapanthi Sabha Kishanlal Dagaliya, General Secretary of Anuvrat Vishwa Bharati Manoj Singhvi, National Committee Member Rajkumar Chaplot, Mumbai President of the Sabha Manek Dhing, Vinod Kothari, Kundan Dhakad were among those present.