03.09.2024: राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम संपन्न
03.09.2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी २०१८-१९ पासून २०२२-२३ या वर्षांचे विधान परिषद व विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार व उत्कृष्ट भाषणासाठी दिले जाणारे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेतील पक्षनेते अंबादास दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.
03.09.2024: President of India Droupadi Murmu presided over a special programme organized on the occasion of the centenary of the Maharashtra State Legislative Council at Vidhan Mandal in Mumbai. The President presented the Best Parliamentarian and the Best Speech Award to the members for the years 2018-19 to 2022-23. The President released the book 'Varishtha Sabhagruhachi Avashyakta Va Mahatva' on the occasion. Governor C.P. Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narvekar, Deputy Chairperson of Maharashtra Legislative Council Dr. Neelam Gorhe, Minister of Parliamentary Affairs Chandrakant Patil, Deputy Speaker of Legislative Assembly Narahari Zirawal, Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Council Ambadas Danve were present.