02.12.2024: एस्टोनियाच्या प्रादेशिक व्यवहार आणि कृषी मंत्री पिरेट हार्टमन यांनी घेतली राज्यपालांची भेट
02.12.2024: एस्टोनियाच्या प्रादेशिक व्यवहार आणि कृषी मंत्री पिरेट हार्टमन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. कृषी आणि अन्न प्रक्रिया, सांस्कृतिक देवाणघेवाण, शिक्षण आणि संशोधनातील सहकार्य आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. भारतातील एस्टोनियाच्या राजदूत मार्जे लुप, उपमंत्री टोनिस तनव, उप राजदूत मार्गस सोलोनन आणि एस्टोनियाचे मुंबईतील मानद वाणिज्य दूत विकास खन्ना बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विकास खारगे, कृषी सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.
02.12.2024: Piret Hartman, Minister of Regional Affairs and Agriculture for Estonia met Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. Matters of promoting cooperation in the areas of agriculture and food processing, cultural exchanges, collaboration in education and research and cyber security were discussed. Ambassador of Estonia in India Marje Luup, Vice Minister Tonis Tanav, Vice Ambassador Margus Solonan and Honorary Consul in Mumbai Vikas Khanna were present. Chief Secretary Sujata Saunik, Principal Secretary to CM and PS Cultural Affairs Vikas Kharge, Secretary Agriculture Jayashree Bhoj and others were present.