02.10.2025 : राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली
02.10.2025 : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राजभवन येथे उभय दिवंगत नेत्यांना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी उभय राष्ट्रीय नेत्यांना अभिवादन केले.
02.10.2025 : Floral tributes were offered to the portraits of the Father of the Nation Mahatma Gandhi and former Prime Minister of India Bharat Ratna Lal Bahadur Shastri on the occasion of their birth anniversary at Maharashtra Raj Bhavan Mumbai. Deputy Secretary to the Governor S. Ramamoorthy offered floral tributes to the portrait of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri. Comptroller of the Governor’s Households Dr Nishikant Deshpande, ADC to the Governor Abhaysinha Deshmukh and other officers and staff of Raj Bhavan also offered their tributes to the great national leaders.