02.10.2022 : मुंबई – देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ
०२.१०.२०२२ : गांधी जयंतीनिमित्त पर्यावरणवादी डॉ. अनिल प्रकाश जोशी यांनी लोकभवन मुंबई येथून सुरू केलेल्या मुंबई - डेहराडून सायकल रॅलीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवला. राज्यपालांनी सायकल रॅलीचे पोस्टर प्रकाशित केले आणि सायकलिंग मोहिमेतील १५ तरुण सदस्यांचा सत्कार केला.
02.10.2022 : 'प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे' ('प्रगति से प्रकृति तक') या मुंबई ते देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीराजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केले. ६७ - वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते रॅलीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले तसेच सहभागी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.