02.10.2022 : महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
०२.१०.२०२२ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त लोकभवन, मुंबई येथे पुष्पांजली अर्पण केली. राज्यपालांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
02.10.2022 : महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील रविवारी ११८ वी जयंती असल्यामुळे राज्यपालांनी शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले.