02.09.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत नामवंत शाळांना ‘सिंघानिया शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार – २०२३’ प्रदान
02.09.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत नामवंत शाळांना 'सिंघानिया शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार - २०२३' प्रदान
02.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राज्यातील आणि देशातील ५१ नामवंत शाळांना 'सिंघानिया शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार - २०२३' राजभवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सिंघानिया समूह शिक्षण संस्थेच्या संचालिका व श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या प्राचार्या डॉ रेवती श्रीनिवासन, रेमंड समूहाचे विश्वस्त एस.एल. पोखरणा, 'सिंघानिया एजुकेशन'चे मुख्य अधिकारी डॉ. ब्रिजेश कारिया तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, सेंट्रल पब्लिक स्कुल, वापी पब्लिक स्कुल, चिन्मय विद्यालय, भारतीय विद्याभवन, सांदिपनी स्कुल, जी डी सोमाणी मेमोरियल स्कुल, ग्रीन लॉन, यांसह विविध शाळांचे मुख्याधिकारी, अध्यक्ष, प्राचार्य, संचालक व विश्वस्त यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.