02.03.2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
Zoom 02.03.2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ बलराम भार्गव, विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. माधुरी कानिटकर, परीक्षा नियंत्रक डॉ अजीत पाठक, कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण, अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारोहात १०८३६ पदवी, पदव्युत्तर पदवी व डिप्लोमा धारकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
02.03.2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ बलराम भार्गव, विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. माधुरी कानिटकर, परीक्षा नियंत्रक डॉ अजीत पाठक, कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण, अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारोहात १०८३६ पदवी, पदव्युत्तर पदवी व डिप्लोमा धारकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.