02.03.2021 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ संपन्न
02.03.2021 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. २ मार्च) संपन्न झाला. दीक्षांत समारोहात राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांना आभासी पद्धतीने पदवी प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारोहात २५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व ८१ बक्षिसे व २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या मिळून २,९३,८५२ पदव्या प्रदान करण्यात आल्या.