02.01.2026: राज्यपालांची मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे भेट,कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने चर्चा
02.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म येथे भेट देऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासोबत नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी, त्यांनी सह्याद्री फार्मच्या वाटचालीचा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेतला. राज्यपालांनी नैसर्गिकशेती चे प्रयोग पाहिले. फळांवरील प्रक्रिया, प्रोसेसिंग युनिट्स, निर्यात, उपलब्ध बाजारपेठ, शेतकऱ्यांना केले जाणारे मार्गदर्शन याबाबत माहिती घेतली. यावेळी राज्यपालांनी काही सूचनाही केल्या. त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य शासन राबवित असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.
02.01.2026: Governor Acharya Devvrat visited Sahyadri Farms at Mohadi (Taluka Dindori) and held discussions with the company’s Managing Director, Vilas Shinde, on natural farming practices. The Governor observed natural farming experiments and reviewed fruit processing, processing units, export activities, market opportunities, and the guidance provided to farmers.