02.01.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा
02.01.2025 : महाराष्ट्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, मुंबई पोलीस सशस्त्र दल पथक, मुंबई पोलीस महिला पथक, ठाणे शहर- लोहमार्ग पोलीस पथक, मुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक तसेच निशाण टोळी व बँड पथक सहभागी झाले होते. यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
02.01.2025 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan attended the Maharashtra Police Raising Day function organised by Maharashtra Police at the State Reserve Police Force Ground at Goregaon Mumbai. The Governor inspected the Ceremonial Parade and accepted the salute presented by the marching columns of State Police. Director General of Police Rashmi Shukla, Mumbai Commissioner of Police Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, police jawans and their family members were present.