02.01.2024:राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा
02.01.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर, तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
02.01.2024: Governor Ramesh Bais attended the Maharashtra Police Raising Day function organised by Maharashtra Police at the State Reserve Police Force Ground at Goregaon Mumbai. Director General of Police (In Charge) Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, police jawans and their family members were present.