01.11.2022 : राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या बोधचिन्हाचे अनावरण
01.11.2022 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा आरंभ तसेच बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्फिन्स्टन तांत्रिक शिक्षण संस्था मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट्स, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ रामास्वामी एन., विविध विद्यापीठांचे कुलगुरू व काही देशांचे वाणिज्यदूत यावेळी उपस्थित होते.