01.08.2022 : राज्यपालांनी पाहिला ‘कालजयी सावरकर’ हा लघुपट
01.08.2022 : राज्यपालांनी पाहिला 'कालजयी सावरकर' हा लघुपट
01.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे जागरण करणारा 'कालजयी सावरकर' हा लघुपट कलाकार व निमंत्रितांसोबत राजभवन येथे पाहिला. लघुपट प्रदर्शनाचे आयोजन दैनिक तरुण भारत व 'विवेक व्यासपीठ'तर्फे करण्यात आले होते. लघुपट प्रदर्शन कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आ. प्रवीण दरेकर, आ. मंगलप्रभात लोढा, हिंदुस्थान प्रचार संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक व्यासपीठाचे दिलीप करंबेळकर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार, अभिनेते मनोज जोशी, सौरभ गोखले तसेच कलाकार व दिग्दर्शक उपस्थित होते.