01.07.2026: राज्यपालांच्या हस्ते क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह या पुस्तकाचे प्रकाशन
Zoom 01.07.2026: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे आज पार पडले. जागतिक वातावरण बदल या विषयावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेखांचे अध्ययन करुन सदर पुस्तक संकलित केले असल्याचे डॉ सावंत यांनी यावेळी सांगितले. या पुस्तकामध्ये हवामान बदलाचा चक्रव्यूह, हवामान बदल आणि मृदा, हवामान बदल आणि जीवघेणे आजार, हवामान बदल आणि अन्नसुरक्षा, कुपोषण आणि हवामान बदल आदी प्रकरणाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
01.07.2026: A book titled Climate Change: Ek Chakravyuh authored by former Maharashtra Minister Dr. Deepak Sawant was released today by State Governor Jishnu Dev Varma in the presence of Deputy Chief Minister Eknath Shinde at Lok Bhavan, Mumbai. Speaking on the occasion, Dr. Sawant said that the book is the result of an extensive study of a wide range of national and international research articles and publications on the subject of global climate change. The book covers several important chapters, including the Climate change and soil health, climate change and life-threatening diseases, climate change and food security, malnutrition and climate change, etc.